मला रोज येणारे इमेल्स , मेसेज मध्ये ७० % मेसेज स्वताच्या लुक्स वरती नाराज असणाऱ्यांचे येतात . हे मेसेज बघून खरचं कीव येते अश्या मुलांची. त्यांना अस् वाटत असत की मी वाईट दिसतो म्हणून मला प्रेम मिळत नाही , माझ्यात काहीतरी कमी आहे. काही जण मी खूप काळा आहे म्हणून नाराज असतात तर काही गोरे आहेत म्हणूनही, काही जाड म्हणून काही अति बारीक , काही परफेक्ट असूनही त्यांना स्वताच्या बाबतीत तिसरच काहीतरी खुपत असत, एक जण तर म्हणे मी खूप केसाळ आहे म्हणून मला प्रेम नाही मिळत ,प्रेम मिळवायला त्वचेचा रंगाचा .शरीराच्या आकाराचा इतर गोष्टींचा काय संबध ?
मी मागेही सांगतील जें लोकं तुमचं लुक्स कन्सिडर करतात तुम्ही त्यांनाच कन्सिडर करण बंद करा. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते , तुम्ही सुपरमार्केट मधून ज्या गोष्टी घेतात त्या तुम्हाला आवडलेल्या असतात पण त्याच गोष्टी घरच्यांना आवडत नाही, पण एखाद्या व्यक्तीला तुमची आवड खूप आवडते. त्यामुळे जोडीदार शोधण्यास कदाचित तुम्हाला अवघड वाटत असेल पण विश्वास ठेवा तुमच्या साठी नक्कीच कोणीतरी आहे.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेफिकर बना आणि मक्खपणे वाट बघा.. नाही . वाईट लोकांना जस आयुष्यातून वगळणे गरजेच असत तस स्वतः अधिकाधिक चांगल बनायचं ही गरजेचे असत.
तुम्ही चेहरा किंवा शरीर खराब आहे ,म्हणून मला कोणी भेटत नाही असं म्हणता मग हे का खराब दिसतोय ह्या कडे का लक्ष देत नाहीत? फक्त रडत बसता की मी घाण दिसतो. खरतर कोणीही घाण दिसत नाही आणि काहीही कमतरता नसते . आपला चेहरा हा प्रोजेक्टर सारखा असतो , आपल्या पोटात आणि मनात जें असत ते आपल्या चेहऱ्यावर रीफलेक्ट होत असत . म्हणजेच तुम्ही जंक फूड ,शिळपाकं, बाहेरच जेवण खात असाल , मनात नेहमी नाराजी , ताण तणाव ,राग असेल तर तुमच्या चेहऱ्यावर मुरमं ,फोड, येणार ,चेहरा उतरतो, चेहरा सुकतो ,डाग पडतात आणि हे असं वर्षानुवर्ष चालत असत मग तुम्ही म्हणता मी घाण दिसतोय .
खोटं वाटत असेल तर लहानपणीचा फोटो बघा , अगदी जेव्हा तुम्ही ५-६ वर्षांचे होता तेव्हा किती छान आणि गोंडस दिसत असता ,कारण लहानपणी तुम्ही रोज दुध प्यायचा, आई नेहमी तुम्हाला पौष्टीक खायला देत असते, तुम्ही खेळकर असता ,मित्रांबरोबर असल्याने मूड छान असायचा आणि अगदी आनंदी . मग हे सारं चेहऱ्यावर दिसून यायचं म्हणून लहानपणी आपण छान दिसायचो , अगदी काळं असलो तरी.
मग आता का आपण बेफिकर होऊन जातो ? कारण आता जबाबदारी वगरे वाढली आहे ? मग सिनेमातल्या हिरो हिरोइन्स ना जबाबदारी नसते अस् वाटतंय का तुम्हाला?
मुळात जबाबदारी चा काही संबंध नाही ये स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा.
तुम्हाला चांगल दिसायचं असेल तर तुम्ही आतून चांगल बना. “जब अंदर से साफ नही तब बाहरसे साफ कैसे दिखेगा ?” स्वताला थोडीतरी शिस्त लाऊन घ्या, रोज अर्धातास तरी व्यायाम करा ,जिम लावली तर उत्तमच ,(जिम मधली मुलं सेक्सी असतात नं ? ) त्यामुळे भरपूर योग्य रित्या घामाद्वारे शरीरातून विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात त्यामुळे साहजिकच चेहरा क्लिअर होतो.
योग्य डायट घ्या . (डायट साठी डायटीशिअनच शोधा, डॉक्टर नको, डॉक्टरांना आणि आपल्याला आहार शास्त्राच समान ज्ञान असत ) तुम्ही जें खाता तसेच तुम्ही दिसता , फ्रेश भाज्या, ताजं बनवलेले घरचं जेवण जेवा, रोजच्या आहारात दुध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे दही ,तूप वगरे खाल्ल्याने चेहऱ्याला योग्य नमी मिळते मग त्या साठी कुठलेही क्रीम वगरे चोपडायची गरज भासत नाही .पण हे सगळं योग्य प्रमाणात खावं. रात्रीचा आहार कमी करा . आणि हो तुम्ही जाड असल्याने काही बिघडत नाही , पण फिट असाव, म्हणजे अगदी जीना चढून आल्यावर धाप लागत नाही नं ?
हे झालं पोटासाठी , पण दुसरं आणि तितकच महत्वाच म्हणजे आपलं मन ही स्वच्छ पाहिजे .त्यासाठी किमान २-३ मिनिट मेडिटेशन करा , जस शारीरिक व्यायाम गरजेचं असत तस मानसिक व्यायाम म्हणजे मेडीटेशन गरजेचं आहे. स्वताला आनंदी ठेवा, तुम्हाला ज्या गोष्ठी आवडतात ,त्या करा ,आवडीची गाणी ,सिनेमे ,वस्तू ,पदार्थ लक्षात ठेवा आणि ते रोजच्या आयुष्यात आणा. त्याने ट्रेस कमी होतो आणि मन फ्रेश होत. लवकर झोपा आणि लवकर उठा , किमान ७ तास झोपा .पाणी भरपूर पीत रहा.
महिन्यातून एकदा रिसोर्ट,स्पा , ट्रेक ला नक्की जा . अगदी कोणी आलं नाही तर एकटे जा . स्वताला वेळ द्या . एखादा छंद जोपासा ,नवीन काहीतरी शिका, जसे की गिटार ,नवीन भाषा,कॉम्प्युटर मधील काहीतरी, कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि नवीन काहीतरी नेहमीच मन तरुण ठेवत . तुमच्या मनाचं आरोग्य जास्त महत्वाच आहे.
लक्षात ठेवा तुम्ही जो पर्यंत आनंदी राहत नाही तो पर्यंत तुम्ही कोणालाच आनंद देऊ शकत नाही , हा स्वतः माझाही अनुभव आहे . दुसऱ्यावर जेवढ प्रेम करता त्या पेक्षा जास्त स्वतावर प्रेम करा. दुसऱ्यांनी तुम्हाला कसं वागवावं अस् तुम्हाला वाटत तसच स्वताला वागवा.दुसऱ्यांसाठी नक्कीच जगा पण स्वताला विसरू नका.
सौथ इंडियन काळे असतात , नॉर्थ इंडियन गोरे , प्रत्येक ५ वा भारतीय जाड आणि २ रा अति बारीक ,मग तिथे का प्रेम विवाह होत नाही ?
खरतर हा आपल्याच विचारांचा खेळ असतो ,,त्यामुळे परदेशातील गोरी लोकं टॅन क्लब मध्ये जाऊन त्वचा काळी करून घेतात कारण तेच …स्वतावर नाखुश असण . देवाने दिलेल्या देणगीचा स्वीकार करून कृतज्ञ रहा. अपंग लोकंही खूप आनंदी असतात हे माहित आहे ना ?
चांगल खा ,चांगल वागा ,आणि चांगले विचार मनात ठेवा मग तुम्ही नक्कीच छान दिसायला लागल .लक्षात ठेवा Looks doesn’t matter but health matters , and when you are healthy you look great.